श्रीनिवास नी. माटे - लेख सूची

युक्रेन युद्धाच्या अनुषंगाने

थोडी पार्श्वभूमी सन १९९१ मधील गोर्बाचेव यांनी केलेल्या सोविएत युनियन विघटनानंतर युरोपमध्ये एस्टोनिया, लाटविया, लिथ्वेनिया इत्यादी पंधरा नवीन राज्ये निर्माण झाली. सोविएत युनियनचे विघटन करताना गोर्बाचेव यांनी युक्रेनबरोबरच इतर काही पूर्व युरोपातील देशांना स्वातंत्र्य दिले. रशियन राष्ट्राध्यक्ष पुटीन यांना मुळात हे विघटनच मान्य नाही. अखंड रशियाच्या ध्येयाने सध्याचे राष्ट्राध्यक्ष पुटीन यांना तेव्हापासूनच पछाडले आहे. जूनमधील …

अमेरिके, ट्रम्पची रात्र आहे; भारता, जागा रहा

अमेरिकेत २०१६ साली रिपब्लिकन पक्षाचे डॉनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले त्याचे सर्वांत मोठें आश्चर्य त्यांना स्वतःलाच वाटले होते. जरी निवडणुकीआधी खुद्द नरेंद्र मोदी ट्रम्प यांची उत्साहाने भलावण करून गेले होते तरी! अमेरिकेने पुरस्कृत केलेल्या जागतिकीकरण धोरणामुळे हजारो अमेरिकन कामगारांच्या नोकऱ्या कमी वेतनात काम करून घेणाऱ्या देशात पसार झाल्या. इतकेच नव्हे तर परदेशातून अमेरिकेत आलेल्या लक्षावधी कामगारांनी …

त्या कृष्णसागरावरती

त्या कृष्णसागरावरती विश्वाच्या लाटा येती गंगांचे फेस उधळती बुडबुडे ग्रहांचे उठती | त्यातील नील गोलाला म्हणतात आपली धरती धरणीच्या पायघड्यांतून या पर्वतमाला घडती | अन् सप्तसमुद्रांवरती जलदांच्या राशी झुलती वाऱ्यावर लहरत जाता अचलांवर करती वृष्टी | की हरित जटा शंभूच्या वृक्षावली दाट उगवती फेसाळत उंच कड्यांतून ओघांच्या सरिता बनती | वेळूवनातून जाता वाऱ्याची गीते होती …

नशीब ही काय चीज आहे?

जानेवारी २०२० पासून जगभर कोव्हिड-१९ महासाथीने मानवसंहार चालवला आहे. याच कालावधीत दक्षिण अमेरिकेतील असंतोष ते इस्राएल- पॅलेस्टिनिअन युद्ध आणि अमेरिकन संसदेवरील जीवघेणा हल्ला ते भारतातील कुंभमेळा व निवडणुकांचे मेळे इत्यादी जागतिक मानवनिर्मित संकटे पाहून मलासुद्धा इतर लोकांप्रमाणे प्रश्न पडला आहे की मानवजातीच्या भविष्यात नशिबाने काय वाढून ठेवले आहे? खरंच, नशीब नशीब म्हणतात ही काय चीज आहे? …

किसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश

सध्या भारतात जो किसान विरुद्ध सरकार लढा चालू आहे त्यावरून आणि लोकशाहीला मारक, तसेच जाचक असणारे इतर अनेक कायदे, रोज नवीन नियम जे महापुरासारखे किंवा महामारीसारखे देशभर पसरत आहेत ते पाहता भारतातील निधर्मी राज्यघटना आणि लोकसत्ता लवकरच संपुष्टात येतील अशी सार्थ भीती वाटू शकेल. अमेरिकेतसुद्धा ‘शेतकी उद्योजक कॉर्पोरेशन्स’नी शेतजमिनी गिळंकृत केल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. …